ग्रीष्म तापला तापला , त्याची कोसळली आग
क्षणापूर्वीचा बहर , त्याची कोमेजली जाग
त्याने डोळ्यातली ओलं , पिली अधाशी ओठानं
आग कंठात रोवली , त्याच्या निखारी बोटानं
अंगा-अंगातले पाणी , गेले आकाशाच्या भेटी
तळ तापल्या नदीचा , आला उसासून काठी
आग पेटत्या ऋतूची , नसानसांत दाटली
फुला-फुलांत झाडाच्या , शिरं रक्ताची फाटली
असे उकले काळीज , दग्ध धरतीची काया
अंग जाळतो साजण , पुन्हा फुलवून याया
1 comment:
वाह......!!
सुंदर रचना.....सुंदर शब्द चूक ठरेल इथे...
दग्धता आहे ना...
Post a Comment