Friday, August 21, 2009

नातं

अविरत वारा मनामधुनी संक्रामितसे मला पुढे
अखंड गतीचा जरी वारसा तरी दिशेचे कोडे पड़े
सरसर शिरवा गारसरीचा पाऊस हळूच भिरभिरतो
अन् मेघाचा कळप हाकूनी वारा अंगातूनी शिरतो
या वा-याची दिशा कोणती? या मेघांचा मार्ग कसा?
कुणी ठरविले म्हणूनी चालती, घेवुनी ते हां नित्य वसा
प्रश्न मनीचा आवर्तुनी मग पुन्हा मनातच फेर धरे
अनामिक टी जाणीव होता हळूच काया थरथरते
या वा-यातूनी या मेघांतूनी सूत्र एकची जे प्रगटे
मर्त्य मनु मी, या स्रृष्टीचा, त्या सूत्राचा भाग असे
अद्वैताचा भाव आकळे, मार्ग जरी हा जुन्या धुळीचा
समाधान हे मला तेवढे , मी वा-याच्या जातकुळीचा

1 comment:

Anonymous said...

Please pay attention to the number of maatraas per line and how they are arranged. Keep changing the words until they are arranged with good distribution of weight.

अखंड गतिचा -- जरी वारसा -- तरी दिशेची -- भ्रांत पडे , हे 'कोडे पडे' पेक्षा मात्रांत बसणारे शब्द आहेत.

पुढे जमल्यास 'गतीचा' शब्दाचे र्‍हस्व इकाराचे विकृत रूप टाळता येईल का, हे बघा. कवितेवर कष्ट घ्या. गुणांचा विकास होईल.